Home Accident News नवी शोरूम एक्स यूव्ही गाडीचा भीषण अपघात; एक ठार -Accident

नवी शोरूम एक्स यूव्ही गाडीचा भीषण अपघात; एक ठार -Accident

Rahuri Accident: एक्स यूव्ही ७०० या नवीन शोरूम गाडीने एकास समोरून उडविले.

NEW SHOWROOM X UV Car's Fatal Accident kill one

राहुरी: राहुरी शिंगणापूर रोडवर ब्राह्मणी येथील वांबोरी फाटा येथे भीषण अपघातात चेडगाव येथील प्रकाश ज्ञानदेव तरवडे (वय ३७) जागीच ठार झाले.

राहुरीकडून शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या एक्स यूव्ही ७०० या नवीन शोरूम गाडीने त्यांना समोरून उडविले. मयत तरवडे ब्राह्मणीकडून राहुरीच्या दिशेने चालले होते. सदर घटना काल शुक्रवारी सायंकाळी ४.३० च्या दरम्यान घडली. दरम्यान अपघात करून फरार होत असलेली गाडी गावातील तरुणांनी दुचाकीवर पाठलाग करून पकडली. सदर गाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सदर वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Web Title: NEW SHOWROOM X UV Car’s Fatal Accident kill one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here