Home संगमनेर संगमनेर: दोघा तोतया पोलिसांनी शेतकऱ्याचे ८५ हजाराचे दागिने लांबविले

संगमनेर: दोघा तोतया पोलिसांनी शेतकऱ्याचे ८५ हजाराचे दागिने लांबविले

Sangamner robbed: रहिमपूर येथील शेतकऱ्याला दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करीत ८० हजार रुपयाचे दागिने व रोख ५ हजार रुपये लांबविल्याची घटना.

two fake police robbed the farmer's jewelery worth 85,000

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगाव परिसरातून रहिमपूर येथील शेतकऱ्याला दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करीत ८० हजार रुपयाचे दागिने व रोख ५ हजार रुपये लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.

रहिमपूर येथील शेतकरी अण्णासाहेब बाबुराव शिंदे (वय 70) हे वडगाव पान परिसरातून जात असताना त्या ठिकाणी दोघे भामटे थांबले. आम्ही पोलीस असून चेकिंग चालू असल्याचे त्यांनी सांगितले. या चोरट्यांनी शिंदे यांच्याकडील 80 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या व 5 हजार रोख एका वाहनाच्या डिकीमध्ये ठेवायला सांगितले. हा 85 हजार रुपयांचा ऐवज लांबून या चोरट्यांनी पलायन केले.

आपल्याकडील दागिने व पैसे चोरल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी आरडाओरड केली. मात्र दोघे भामटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 416/2022 भा.दं.वि.कलम 419, 171, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार आवटी हे करीत आहेत.

Web Title: two fake police robbed the farmer’s jewelery worth 85,000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here