Home अकोले राजूर: सर्वोदय विद्यालयातील गणरायाला भव्य मिरवणुकीतून निरोप, मोठा जनसागर

राजूर: सर्वोदय विद्यालयातील गणरायाला भव्य मिरवणुकीतून निरोप, मोठा जनसागर

Rajur Sarvodaya Vidya Mandir Ganpati: गणरायाला भव्य दिव्य अशा मिरवणुकीतून जल्लोषात निरोप, ढोल, लेझीम, झांज, टिपरी ह्या पथकांचे विशेष आकर्षण.

Rajur Ganaraya of Sarvodaya Vidyalaya in a grand procession

राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा,वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील गणरायाला भव्य दिव्य अशा मिरवणुकीतून जल्लोषात निरोप देण्यात आला. यावेळी राजूर गावातील नागरिक एकच गर्दी करत मोठा जनसागर उसळला होता.  

या कार्यक्रमप्रसंगी सुरुवातीला विद्यालयात महापूजा व आरती करण्यात आली. गणरायाची पुजा व आरती करून विद्यालयातून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत ढोल, लेझीम, झांज, टिपरी अशा विविध पथकांचा समावेश होता. मोठ्या जल्लोषात राजूर गावातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली होती. उप प्राचार्य बी.एन. ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती. या मिरवणुकीत ढोल, लेझीम, झांज, टिपरी ह्या पथकांचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी विद्यार्थी व गावातील नागरिकांनी या उत्सवाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी सत्यानिकेतन संस्थेचे सचिव टी.एन. कानवडे, संचालक मिलिंदशेठ उमराणी, विजय पवार, उपसरपंच गोकुळ कनकाटे, एस.एस. पाबळकर यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, पर्यवेक्षक मधुकर मोखरे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राजूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

अखेर राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या हस्ते आरती करून भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.

Web Title: Rajur Ganaraya of Sarvodaya Vidyalaya in a grand procession

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here