Home क्राईम Gang Rape:  बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत सामूहिक बलात्कार

Gang Rape:  बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत सामूहिक बलात्कार

Gang Rape:  पीडितेला शेतात जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर अत्याचार.

Gang rape by being dragged to the corn field

पुणे: इंदापूरात बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (२० ऑगस्ट) घडलेल्या या घटनेसंदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वालचंदनगर (ता. इंदापूर) पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भा. द. वि. ३७६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील राहुल हनुमंत जाधव (रा. बेलवाडी, ता. इंदापूर) या मुख्य आरोपीस वालचंदनगर पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. तर दोघे अद्याप फरार आहेत.

शनिवारी (२० ऑगस्ट) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत राहुल हनुमंत जाधव याने पीडितेला शेतात जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने ओमिनी या चारचाकीमधून आलेल्या त्याच्या दोघा साथीदारांपैकी (नाव व पत्ता माहीत नाही) एकाने पीडितेवर जबरदस्ती केली. या दोघांनीही चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. त्यांनतर आरोपींनी पिडीतेस ओमिनी गाडीतून इंदापूर बारामती रोडवर असलेल्या एका घरात घेऊन गेले. थोड्या वेळाने त्याच गाडीतून आरोपींनी तिला बेलवाडी बस स्थानकावर सोडले.

या तिघा नराधमांपैकी मुख्य आरोपी असलेल्या राहुल हनुमंत जाधव याला वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.

Web Title: Gang rape by being dragged to the corn field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here