Home क्राईम संगमनेर घटना: प्रेयसीने घेतली फाशी, प्रियकराच्या कुटुंबावर गुन्हे दाखल

संगमनेर घटना: प्रेयसीने घेतली फाशी, प्रियकराच्या कुटुंबावर गुन्हे दाखल

Sangamner Suicide Case: प्रेयसी महिलेने थेट पहाटे-पहाटे गावकुसाबाहेर जाऊन फाशी घेत आत्महत्या केली.

Girlfriend Suicide herself, case filed against boyfriend's family

संगमनेर: आपल्या नवऱ्याच्या प्रेयसिला बायकोने घरात घुसून मारले. माझ्या पतीशी प्रेमसंबंध ठेवले तर तुझ्याकडे पाहुण घेईल. अशा प्रकारची चकमक दोन महिलांमध्ये झाली. मात्र हा वादात्मक सदमा इज्जतीचा पंचनामा करणारा ठरल्याने प्रेयसी महिलेने थेट पहाटे-पहाटे गावकुसाबाहेर जाऊन फाशी घेत आत्महत्या केली. ही घटना संगमनेर तालुक्यातील ‘जोगेपठार येथील साकूर शिवारात दि. १४ ऑगस्ट २०२२ साली सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

यात ३८ वर्षीय एका मागासवर्गीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, जेव्हा घटना घडली तेव्हा त्याच परिसरात जवळ-जवळ दोन फाशीचे दोर लटकविलेले दिसले. तर, एकाच दोरला फक्त महिला लटकलेली होती. त्यामुळे, हा फसवून घातपात तर नाही ना केला. ? अशी शंका स्थानिक नागरिकांनी उपस्थित केली होती. मात्र, आठ दिवसाच्या चौकशीनंतर पोलिसांनी योग्यतो निष्कर्ष काढला आहे. त्यानंतर मयत महिलेच्या नात्यातील व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनंतर घरात घुसून मारहाण करणे, शिविगाळ, दमदाटी करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा विविध कलमान्वये पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात आरीफ पटेल, दादा पटेल, साहिल पटेल (रा. साकूर) यांच्यासह दोन व्यक्तींची फिर्यादीत आहेत. पुढील तपास पोलीस उपाधिक्षक राहुल मदने करीत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी आरिफ पटेल (रा. साकूर, ता. संगमनेर) याचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर प्रेम जडले होते. पहिल्यांदा नजरानजर आणि नंतर हायबाय होऊन हा सिलसिला पुढे चालु झाला. कालांतराने यांच्यात मैत्री आणि त्याचे रुपांतर प्रेमात परावर्तीत झाले. तसे अंतर फार काही दुर नसल्याने त्यांच्या भेटीगाठी चांगल्या रंगू लागल्या होत्या. त्या दरम्यानच्या काळात या कानाची खबर त्या कानाला नव्हती. त्यामुळे, ती तिच्या घरी नवरा आणि कुटुंबापासून चोरुन लपून आपले प्रेम व्यक्त करत होते तर हा पटेल देखील न पटेल असे कृत्य घरच्यांच्या त्रयस्त करीत होता. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेख झाला की त्याची फळे भोगावीच लागतात. त्यामुळे, पटेल व त्यांच्या प्रियसिच्या कहाण्या हळुहळू बाहेर पडू लागल्या होत्या. त्यामुळे, कानोकानी ख़बार पटेल यांच्या घरापर्यंत गेली आणि नको तो राडा होऊन बसला. ज्यामुळे, संपुर्ण कुटूंबाला आता जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. तर, एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे.

दरम्यान, पटेल आणि त्याच्या प्रेयसिची चर्चा गावभर पसरली आणि ती पटेल याच्या पत्नीसह कुटुंबाला काही सहावेना. त्यामुळे, घरातील पाच जणांनी थेट प्रेयसिचे घर गाठले. दि. १४ रोजी पटेल कुटुंबियांनी तिचा चांगलाच समाचार घेतला. तर, मी एक विवाहित स्त्री आहे, तू देखील आहेस. असले उद्योग करणे चूक आहे. का उगच दोघांचा संसार उध्वस्त करते. अशा प्रकारे त्यांच्यात चर्चा आणि बाचाबाची झाली. परंतु, प्रकरण नाजूक असल्यामुळे दोघींनी एकमेकींवर तोंडसुख घेतले. अर्थात या गोष्टी होणे सहाजिक आहे. मात्र, या प्रेमाचा शेवट असा होईल याची कोणाला कल्पना नव्हती. प्रेयसिला तिच्या घरात घुसून मारहाण करण्यात आणि तर शिविगाळ दमदारी करुन धमकी देखील दिली. मात्र, वाद फक्त इतकाच होता. की, तुमचे प्रेम संबंध तोडा आणि आपापल्या वाटा वेगळ्या करा. त्यानंतर वाद मिटत होता. दरम्यान, आपल्या घरात घुसून आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. आपल्या समाजात सर्वांना माहित झाले, समाज काय म्हणेल, कुटुंबाला कसे तोंड द्यायचे, उद्याच्या भविष्यात हे दाग पुसतील का? त्या दिवशी झालेल्या वादनंतर मयत महिला तथा प्रेयसी प्रचंड अस्वस्थ होती. तिने त्यानंतर स्वतःला संपवून घेण्याचा निर्णय घेतला. एक दोरी घेऊन महिलेने स्वतःला संपवून घेतले. त्यानंतर सकाळी साकूर ग्रामपंचायतीच्या पाठीमागे असणाऱ्या एका झाडाला एके प्रेत लटकताना दिसले. त्यानंतर घडलेला घटनाक्रम समोर आला. परंतु, महिला झाडावर चढली कशी ? दोर बांधला कसा आणि आत्महत्या केली कशी असे अनेक प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. तर, जवळच एका झाडावर देखील दुसरा दोर लटकलेला होता. त्यामुळे तेथे काही संशयित बाबी होत्या. मात्र, प्रथमतः आकस्मात मृत्यूची नोंद आणि सखोल चौकशीअंती आज (दि.२२) रोजी पाच जणांवर गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Girlfriend Suicide herself, case filed against boyfriend’s family

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here