Home महाराष्ट्र संतापजनक: अल्पवयीन मुलीचं शाळेतून अपहरण करून धावत्या कारमध्ये बलात्कार

संतापजनक: अल्पवयीन मुलीचं शाळेतून अपहरण करून धावत्या कारमध्ये बलात्कार

Rape Case:  १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केला.

minor girl was kidnapped from school and rape in a running car

वर्धा: वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

पीडित मुलगी शाळेत निघाली असताना दोघांनी चाकूचा धाक दाखवून तिचं अपहरण केलं. त्यानंतर धावत्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने मोठी खळबळ उडली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्ह्यातील पुलगाव येथील, 13 वर्षीय पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता, आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती कारमध्ये ओढलं.

पीडितेचे अपहरण करताच, नराधमांनी सुसाट वेगाने कार पळवली. पीडिता ही आरडाओरड करीत होती. पण, कारच्या काचा बंद होत्या. दरम्यान, धावत्या कारमध्येच आरोपी सुमेध याने पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, या प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली.  तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच, आईने तातडीने पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि एका मित्राविरुद्ध तक्रार दिली.

तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.  पोलिसांनीही तत्काळ घटनेची दखल घेत आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे.

Web Title: minor girl was kidnapped from school and rape in a running car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here