Home महाराष्ट्र कॅटरिंगच्या कामावरून परतत असताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

कॅटरिंगच्या कामावरून परतत असताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Gang rape of a minor girl while returning from catering work

मुंबई | Gang Rape Case: गोवंडी शिवाजी नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. कॅटरिंगच्या कामावरून ही मुलगी घरी परतत असताना एका टोळक्याने त्या तरुणीला पकडले आणि बाजूला असलेल्या एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पसार झाले. मुलीने बाहेर येऊन आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली.

सकाळी साडेचारच्या दरम्यान, एक महिला रोड नंबर १३ येथील बस डेपोच्या जवळून जात असताना चार ओळखीचे लोक तिला भेटले होते. त्यातील एकाने काहीतरी बोलायचे आहे म्हणत एका खोलीत नेले. त्यानंतर बाकीचे तीन जण गेले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला. याबाबत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  त्यानंतर पोलिसांची १० पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यातील दोन आरोपींना अटक केली असून दोघेही अल्पवयीन आहेत,” अशी माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रकाने यांनी दिली.

Web Title: Gang rape of a minor girl while returning from catering work

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here