Home औरंगाबाद महाराष्ट्र हादरले! महिलेवर सामूहिक बलात्कार; नंतर दगडाने ठेचून हत्या

महाराष्ट्र हादरले! महिलेवर सामूहिक बलात्कार; नंतर दगडाने ठेचून हत्या

Crime News: घरी जात असलेल्या ३३ वर्षीय महिलेला रविवारी भरदुपारी तीन नराधमांनी उचलून काटेरी झुडपात नेले. तेथे झाडाला तिचे हात बांधून आळीपाळीने अत्याचार(Gang Rape) केल्यानंतर तिचा खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना.

The gang rape of a woman Later stoned to death

छत्रपती संभाजीनगर : जुन्या बीड बायपास रस्त्याने चकलठाण्याकडे घरी जात असलेल्या ३३ वर्षीय महिलेला रविवारी भरदुपारी तीन नराधमांनी उचलून काटेरी झुडपात नेले. तेथे झाडाला तिचे हात बांधून आळीपाळीने अत्याचार केल्यानंतर तिचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. बलात्कार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली. राहुल संजय जाधव (१९, रा. ऋषिकेशनगर, कालवस्ती, चिकलठाणा), प्रीतम ऊर्फ सोनू महेंद्र नरवडे (२४) आणि रवी रमेश गायकवाड (३४, दोघे रा. सदर) अशी अत्याचार करणाऱ्या अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सिल्लोड तालुक्यातील एक कुटुंब विमानतळ परिसरात राहून मोलमजुरी करीत उदरनिर्वाह करते. पती सकाळी मिस्तरी कामावर गेल्यानंतर पीडित संगीता (नाव बदललेले) मुलांना शाळेत सोडून त्या परिसरातील चर्चमध्ये दुपारी शाळा संपेपर्यंत प्रार्थना करीत असत. चर्चमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मुलांना घेऊन त्या रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास गेल्या. मात्र, मासिक पाळी सुरू होऊन पोट दुखू लागल्यामुळे त्या मुलांना चर्चमध्ये थांबवून घराकडे निघाल्या. विमानतळाच्या भिंतीलगत वेड्या बाभळीच्या झाडांतून रस्त्याने त्या जात होत्या. तेथे नशा करीत बसलेल्या तीन आरोपींनी त्यांना अडविले. आरोपींनी मारहाण करून त्यांना उचलून वेड्या बाभळीमध्ये नेले. त्यांचे हात झाडाला बांधून आळीपाळीने बलात्कार केला. त्यांच्या गुप्तांगावरही मारहाण करण्यात आली. अखेर, आरोपींनी तीक्ष्ण दगडाने ठेचून निर्घृण खून केला आणि ते निघून गेले.

दरम्यान दुपारी संगीता यांचा लहान मुलगा घराकडे जाण्यास निघाला. रस्त्याने जाताना त्यास भिंतीलगत एक महिलेचा मृतदेह दिसला. त्याने घरी आल्यानंतर काहींना ही माहिती दिली. मात्र सगळ्यांनीच त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा त्याने सात वर्षांच्या मोठ्या भावाला सांगितले. त्याने चुलत्यास माहिती दिल्यानंतर त्यांनी इतरांसोबत धाव घेतली. तेव्हा माहिती देणाऱ्या मुलांचीच आई निघाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The gang rape of a woman Later stoned to death

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here