Home क्राईम प्रजासत्ताक दिनी महिलेवर सामूहिक बलात्कार, तिचे केस कापले, तिला चपलांचा हार घालत….

प्रजासत्ताक दिनी महिलेवर सामूहिक बलात्कार, तिचे केस कापले, तिला चपलांचा हार घालत….

Gang rape of a woman on Republic Day

नवी दिल्ली | Crime News: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच राजधानी दिल्लीत महिलेवर सामुहिक बलात्काराची (gang rape)  घटना समोर आली आहे. दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचे केस कापले, तिला चपलांचा हार घालून रस्त्यावर फिरायला लावले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. पीडित महिला आणि आरोपींमध्ये वैमनस्य होतं, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  महिलेचे लग्न झाले असून तिला एक मूल आहे. मध्यंतरी अनेक महिने तिच्या शेजारी राहणारा एक तरुण तिचा पाठलाग करत होता. तो नंतर नोव्हेंबरमध्ये आत्महत्या करून मरण पावला. त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या आत्महत्येसाठी महिलेला जबाबदार धरले होते. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वैयक्तिक वैमनस्यातून एका महिलेवर लैंगिक अत्याचाराची (sexual assault) दुर्दैवी घटना शाहदरा जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे आणि चौकशी सुरू आहे. पीडितेला सर्व शक्य मदत आणि समुपदेशन करण्यात येत आहे,

याबाबत माहिती महिलेच्या लहान बहिणीने पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Gang rape of a woman on Republic Day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here