Home मनोरंजन अभिनेत्री मौनी रॉय विवाहबंधनात, दक्षिणात्य लुक फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री मौनी रॉय विवाहबंधनात, दक्षिणात्य लुक फोटो पाहिलेत का?

Mauni Roy Wedding Photo:  छोट्या पडद्यावरील “नागीण फेमस” यशस्वी अभिनेत्री मौनी रॉय विवाहबंधनात अडकली आहे. मौनीने प्रियकर सूरज नांबियारसोबत गोव्यात लग्नगाठ बांधली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मौनी तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. (Mouni Roy and Suraj Nambiar Wedding)

मौनी आणि सुरज यांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने झाले आहे.मौनीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून तिला लाल रंगाची बॉर्डल आहे.मौनीने सोन्याचे दागिने घातले असून तिचा हा ब्राइडल लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सुरजने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. अत्यंत साधा मेकअप करुनदेखील मौनीचा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मौनी आणि सुरजचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या काही वर्षांपासून मौनी आणि सुरज एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती. मौनीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Mauni Roy Wedding Photo 1

Mauni Roy Wedding Photo 2

Mauni Roy Wedding Photo 3

Mauni Roy Wedding Photo 4

Mauni Roy Wedding Photo 5

Also See: Marriage Anniversary wishes in Marathi  

Web Title: Mauni Roy Wedding Photo Mouni Roy and Suraj Nambiar Wedding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here