Home अमरावती महाप्रसादाला नेतो म्हणत तरुणीवर सामूहिक अत्याचार- Gang Rape

महाप्रसादाला नेतो म्हणत तरुणीवर सामूहिक अत्याचार- Gang Rape

Breaking News | Gang Rape:  नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिला शेतातील खोपडीत नेऊन पाच जणांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार केल्याची घटना.

The gang rape of a young woman by calling Mahaprasad a leader

अमरावती:  महाप्रसादाच्या कार्यक्रमाला नेत असल्याचे सांगत २३ वर्षीय तरुणीला तालुक्यातील मालखेड येथे आणले. परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिला शेतातील खोपडीत नेऊन पाच जणांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार केला. विरोध दर्शविताच जबर मारहाणदेखील करण्यात आली.

याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी २९ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास आरोपींविरुद्ध अपहरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पाचही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

महेश वाघमारे (२५), पिंटू हरले (३९), रमेशभलावी (४०), इस्माईल खाँ (६५), नितीन ठाकरे (२५, सर्व रा. मालखेड) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी महेश वाघमारे हा २३ वर्षीय फिर्यादी पीडितेला तिच्या आईजवळून महाप्रसादाकरिता मालखेड येथे घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेला. पीडितेला आरोपीने रात्रभर त्याच्या घरी ठेवले. २८ जानेवारी रोजी तिच्या गावी सोडून देण्यासाठी महेशने तिला दुचाकीवर घेतले. पिंटू हरले याला सोबतीला घेत त्याने तिला मालखेड शिवारातील शेतात नेले. रात्री त्या दोघांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. यादरम्यान उर्वरित तिघे शेतात पोहोचले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. याबाबत पीडितेने शेंदूरजनाघाट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Web Title: The gang rape of a young woman by calling Mahaprasad a leader

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here