धक्कादायक! कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार
Gang Rape: दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड ड्रिंकमधून दारु पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना.
अकोला: राज्यात महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना अकोल्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड ड्रिंकमधून दारु पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना अकोला शहरातून समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा बर्थडे साजरा करुन घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक त्यांच्याच ओळखीतला युवक भेटला. यावेळी “तुम्हा दोघींना घरी सोडून देतो असं म्हणून त्याने दोघींनाही गाडीवर बसवलं. त्यानंतर तो या दोघींना सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पवन वाटिकेत घेऊन गेला.
इथे आल्यावर त्याने चॉकलेट आणि थम्सअप नावाचं कोल्ड ड्रिंक दोघांनाही प्यायला दिलं. यावेळी त्या दोघींनी कोल्ड ड्रिंक प्यायलं आणि चॉकलेटही खाल्लं. कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर दोघींनाही गुंगी यायला लागली. याचा फायदा घेत तो युवक त्या दोघींनाही घेऊन टेरेसवर गेला आणि दोघींसोबत बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
त्याचवेळी त्याचा मित्रही तिथे दाखल झाला आणि त्यानेही त्या दोघींवर लैंगिक अत्याचार (sexual abused) केले. या संपूर्ण घटनेत चार जणांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. तर यातील दोघांनी दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तर अन्य दोघांनी त्यांना याबाबत सहकार्य केले असल्याचे कळते.
काल रात्री या दोन्ही अल्पवयीन मुलींना घरी पोहचायला उशीर झाला, म्हणजेच रात्रीचा एक वाजला. घरच्यांनी या दोन्ही मुलींना उशिरा आल्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मुलींनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. यानंतर मुलींच्या पालकांना धक्काच बसला.
दोन्ही मुलींच्या नातेवाईकांनी तात्काळ सिव्हिल लाइन पोलिस ठाणे गाठले आणि मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल तक्रार दिली. सध्या या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Gang rape of two minor girls by drinking alcohol from cold drink
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App