Home अकोले संकेत नवलेचे मारेकरी मोकाटच, नवलेवाडीचे ग्रामस्थ संतप्त

संकेत नवलेचे मारेकरी मोकाटच, नवलेवाडीचे ग्रामस्थ संतप्त

Sangamner Murder Case:  अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी संकेत नवले याचा खून होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपी सापडलेले नाहीत.

Sanket Navale Murder Case killer is still at large, the villagers of Navalewadi are angry

संगमनेर:  येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी संकेत नवले याचा खून होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपी सापडलेले नाहीत. आरोपी सापडत नसल्याने नवलेवाडी येथील ग्रामस्थ संतप्त दिला आहे. अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील रहिवासी असलेला संकेत नवले हा विद्यार्थी संगमनेरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

आठ दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह संगमनेर शहरातील सुकेवाडी रस्त्यावरील नाटकी नाल्यात आढळला होता. त्याच्या डोक्यावर जखमा आढळल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. संकेत याचा धारदार हत्याराने खून करून मृतदेह शहरातील पुनर्वसन कॉलनी परिसरातील नाटकी नाल्यात फेकून देण्यात आला होता. दि. ८ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता. पोलिसांनी त्याची रुम शोधली, त्याचे मित्र कोण आहेत याची चौकशी केली. त्यानंतर काही संशयित गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. नवले हा मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर तो रुमवर गेला नाही. त्याचे मोबाईल रेकॉर्ड आणि अन्य काही गोष्टींचा बारकाईने तपास पोलिसांनी पोहोचू शकले नाही. पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी संगमनेर येथे भेट देऊन ज्या ठिकाणी संकेत याचा मृतदेह आढळला होता त्या ठिकाणची बारीक पाहणी केली. पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचना केल्या. मात्र आठ दिवस होवूनही आरोपींचा शोध लागत नसल्याने संकेतच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींचा शोध लागत नसल्याने पोलीस दबावात आलेले आहेत. रविवारी संकेत याचा दशक्रिया विधी आहे. त्याच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नाही तर पोलीस ठाण्यासमोर नवलेवाडीचे ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: Sanket Navale Murder Case killer is still at large, the villagers of Navalewadi are angry

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here