Home बीड गॅस सिलिंडरचा स्फोट; एक ठार, चार जखमी

गॅस सिलिंडरचा स्फोट; एक ठार, चार जखमी

Gas cylinder explosion: पत्र्याच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना. यामध्ये चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

Gas cylinder explosion One killed, four injured

परळी |जि. बीड: येथील बरकतनगर भागातील चौक परिसरात पत्र्याच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात चौदावर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले. ९ मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

बरकतनगर भागातील एका पत्र्याच्या घराजवळ अचानक आग लागली. ही आग दुसऱ्या बंद घरामध्ये पसरली. त्या घरात असलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की बाजूला असलेल्या अदिल उस्मान शेख नामक १४ वर्षीय मुलाच्या पोटाला जबर इजा होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेत शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोघे, असे चार जण जखमी झाले.

Web Title: Gas cylinder explosion One killed, four injured

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here