Home संगमनेर संगमनेर: रेकॉर्डवरील तरुणाच्या घरात मिळाला गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे हस्तगत

संगमनेर: रेकॉर्डवरील तरुणाच्या घरात मिळाला गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे हस्तगत

Breaking News | Sangamner Crime: तरुणाच्या घरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे हस्तगत.

Gavathi pistol found in youth's house on record, live cartridges seized

संगमनेर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हाती घेतलेल्या कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत शुक्रवारी (दि. १२) तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे कारवाई करण्यात आली. पोलिस रेकॉर्डवरील तरुणाच्या घरातून संगमनेर तालुका पोलिसांनी गावठी कट्टा, जिवंत काडतुसे हस्तगत केली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख (वय २८, रा. पारेगाव बुद्रुक, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल संपत जायभाये यांनी फिर्याद दिली आहे.. यापूर्वी त्याच्याविरोधात २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये तालुका पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयित गुन्हेगारांची तपासणी, पसार आरोपींची शोधमोहीम आदी संदर्भाने संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे-पाटील यांनी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख याच्या घरी पोलिस गेले असता, गावठी कट्टा व जिवंत काडतुसे हस्तगत केली. एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन राऊंड एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत सापडले. पोलिसांनी गावठी कट्टा, जिवंत काडतुसे हस्तगत करत गडाख याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Gavathi pistol found in youth’s house on record, live cartridges seized

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here