Home संगमनेर ब्रेकिंग! संगमनेरातून दोन जण तडीपार !

ब्रेकिंग! संगमनेरातून दोन जण तडीपार !

Breaking News | Sangamner: संगमनेरमधील दोघा गुन्हेगारांना नगर जिल्ह्यासह लगतच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश.

Two people escaped from Sangamner

संगमनेर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवर असलेल्या संगमनेरमधील दोघा गुन्हेगारांना नगर जिल्ह्यासह लगतच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी काढले आहेत.

कासिम असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) व इस्माईल निसार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघांची नावे असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

कासिम कुरेशी याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अल्पवयीन मुलीस पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेणे, प्राण्यांना निर्दयतेने वागविणे, त्यांची कत्तल करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे चार गुन्हे दाखल आहेत.

इस्माईल पठाण याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, वाहन चोरी करणे अशा स्वरूपाचे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे शहर पोलिसांनी या दोन्ही गुन्हेगारांना कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हद्दपार करण्यासाठीचे प्रस्ताव पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्याकडे पाठवले होते. त्यानंतर पुढील निर्णयासाठी हे प्रस्ताव प्रांताधिकारी हिंगे यांच्याकडे पाठविण्यात आले. हिंगे यांनी या प्रस्तावावर निर्णय देताना कासिम कुरेशी याला एक वर्षांसाठी तर इस्माईल पठाण याला सहा महिन्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यासह लगतच्या सिन्नर व जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.

दरम्यान  संगमनेर पोलीस उपविभागात 23 जणांना प्रवेश बंदी लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता व आचारसंहितेदरम्यान येणारे विविध सण, उत्सव शांततेत पार पाडावे कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

Web Title: Two people escaped from Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here