Home अहमदनगर घाटशिळ पारगाव धरण ठणठणीत कोरडे

घाटशिळ पारगाव धरण ठणठणीत कोरडे

घाटशिळ पारगाव धरण ठणठणीत कोरडे

खरवंडी कासार प्रतिनिधी सतिष जगताप– ऑगस्ट महिणा संपत आला तरी तालुक्यात समाधान कारक पाऊस नसल्यामुळे पाणी टंचाईच्या उंबारठ्यावर तालुका असुन अधुन मधुन पडणाऱ्या भिज पावसाने खरीप पिकांना जिवदान मिळवुन चाऱ्याचा प्रश्न काही काळ पुरता सुटला आहे .
गेल्या वर्षी तालुक्यात समाधान कारक पाऊस झाला या पाणी साठ्यावर आतापर्यंत पाण्याची व सिंचनाची जेमतेम गरज भागली उपलब्ध पाण्यावर ऊस व फळबागेचे क्षेत्र वाढले पावसाने तान दिल्याने चाऱ्यासाठी मोठया प्रमाणावर ऊसाला मागणी दुभत्या जनावराच्या मालकाकडुन वाढत आहे तालुक्यात पावसाची सरासरी ५७९ मिली लिटर असुन पावसळा ऐन भरात असुन निम्या पंर्यत खंडींत पाऊस झाला आज अखेर पाथर्डी येथे २८२ टाकळी मानुर २०७ कंरजी १७९ मिरी २९७ माणीकदौंडी २४७ कोरडगाव 3o२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली ज्या धरण व  पाझर तलावमध्ये जेमतेम पाणी आहे त्यामध्ये विद्युत मोटारी लावुन पाणी ओढणाऱ्या शेतकऱ्याची संख्या वाढत आहे प्रशासनाचे लक्ष नाही काही शेतकऱ्यानी अशा पाण्यावर शेततळी भरून घेतली आहे भुजल पातळी वेगाने घटत असुन नगर जिल्हाच्या सिमेवर घाटशिळ पारगाव धरण ठणठणीत कोरडे असुन आष्टी , पाथर्डी , तालुक्यातील नदयाचे पाणी या धरणात जाते सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती  या धरणाच्या पाण्यावर आवलंबुन आहे शेकडो हेक्टर अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होई यावर्षी मात्र पावसा अभावी पावसळ्यात दुष्काळाची चाहुल लागली आहे भाज्याचे दर गगणाला भिडीवणु पाले भाज्याना कवडी मोल भाव मिळत आहे दुध दर वाढ झाली असली तरी चारा महागला आहे दाळीबीला भाव नाही कपाशीची पावसा अभावी पुर्ण क्षमतेने  वाढ नाही संत्रा मोसबीला गिऱ्हाक नाही अशी अवस्था फळबाग मालकाची झाली आहे ढगाळ वातावरणामुळे रोगाई वाढली आहे पुरेसा पावसाअभावी दलदल वाढली आहे .एकुनच पावसाअभावी सर्वत्र चिंतेचे वातावरण असुन बाजारपेठा सनासुदिच्या दिवसात ओस पडल्या आहेत.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 websites

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here