Home अहमदनगर बेलवंडी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

बेलवंडी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

बेलवंडी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील भाऊसाहेब कोंडीबा शेलार वय(४८) या शेतकऱ्याने घरातील पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली . हा प्रकार दि. २९ रोजी दुपारी १.३० च्या  सुमूारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

याबाबतची माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात आज दि.२९ रोजी दुपारच्या वेळी भऊसाहेब कोडींबा दुपारच्या वेळी भाऊसाहेब कोंडीबा शेलार यांचे गावातील काही इसमांबरोबर जोराचे भांडण झली. ही माहिती मयताचा मुलगा भाऊसाहेब  शेलार याला मिळताच त्याने आपल्या दुचाकीवरुन वडिलांनी घरी नुऊन सोडलं व तो शेतात गेला असतांना, दुपारी दीडच्या सुमारास भाऊसाहेब शेलार यांनी घरातील पंख्याला ओढण्याच्या सहायाने गळफास घेतली असल्याची माहिती प्रवीण यास शेजाऱ्यांनी फोनवरुन दिली. प्रवीण याने तत्काळ घरी जाऊन पाहिले असता, त्यास वडील मयत झालेच्याचे दिसुन आले. याबाबत पंख्याने बेलवंडी पोलीस ठाण्यातील माहिती देऊन शेलार यांच्या मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णाललयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान , याप्रकरणी मयताच्या मुलाने सांगितले की, त्याच्या वडिलांनी गावातील एका महिलेला उसणे दिलेले पैसे परत मागितल्याने त्या महिलेने शेलार यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यामुळेच शेलार यांनी आत्महत्या केली. बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादावरुन पोलिसांनी बेलवंडी येथील एका महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्यप्रकरणी गुन्हा दाखल करुन तिला उशिरा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समजली आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here