Home पुणे Rape | भावकीतील व्यक्तीनेच तरुणीला ब्लॅकमेल करून केला बलात्कार

Rape | भावकीतील व्यक्तीनेच तरुणीला ब्लॅकमेल करून केला बलात्कार

girl was rape by the relation person by blackmailing her

पिंपरी | Pimpri: भावकीतील व्यक्तीनेच एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना ऑगस्ट २०२१ ते ११ मे २०२२ या कालावधीत आनंदनगर जुनी सांगवी येथे घडली. याबाबत पिडीत मुलीने गुरुवारी सांगावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर सदाशिव चौरे वय २२ ता. केज जिल्हा बीड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच गावातील आहे. तसेच ते एकाच भावकीतील आहे. सांगवी येथे मागील तीन महिन्यापासून आरोपी व फिर्यादी एकत्र राहत होते. आरोपीने फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व फिर्यादीचे फोटो काढले. आरोपीने फिर्यादी यांना ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध (Sexual relation) प्रस्थापित केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Web Title: girl was rape by the relation person by blackmailing her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here