Home संगमनेर Fire | संगमनेर शहरात जळीतकांड: अज्ञाताने तीन वाहने जाळली

Fire | संगमनेर शहरात जळीतकांड: अज्ञाताने तीन वाहने जाळली

Three vehicles set on fire in Sangamner

Sangamner | संगमनेर: संगमनेर शहरात विविध ठिकाणी अज्ञातांनी घरासमोर उभी असलेली दोन दुचाकी व एक रिक्षा ही वाहने पेटविल्याची (Fire) घडली आहे. शुक्रवारी रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गेल्यावर्षी देखील अशाच प्रकारे दुचाकी जाळून टाकल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील विविध ठिकाणी मध्यरात्री अंदाजे दोन ते तीन दरम्यान अज्ञातांनी वाहने पेटवून दिली. घोडेकरमळा येथील जय तपेंद्रबहादूर सुनार यांच्या घरासमोरील जुपिटर दुचाकी क्रमांक एम.एच.१७ सी.एल. ७२४२ पेटविली. परिसरातील नागरिकांनी कळविल्याने घरातील सदस्यांनी आग विझविली. तोपर्यंत दुचाकीचे जळून मोठे नुकसान झाले होते.

तसेच सुनार यांचे मित्र अकोले नाका येथील कपिल दिली शिंदे यांची रिक्षा क्रमांक एम.एच. १७ एन. ११७७ व जेधे कॉलनी येथील आकाश बाळू जेधे यांची दुचाकी अज्ञातांनी पेटविली. या आगीत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे वाहने जाळण्याच्या घटना घडत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सुनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक खाडे हे करीत आहे.  

Web Title: Three vehicles set on fire in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here