Home क्राईम Rape: अत्याचार करून लग्नास नकार दिल्याने मुलीने घेतले पेटवून

Rape: अत्याचार करून लग्नास नकार दिल्याने मुलीने घेतले पेटवून

Pune Minor Girl Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

girl was taken and set on fire for refusing to marry after rape

पुणे: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने मुलीस मानसिक धक्का बसल्याने अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी मुलीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७८/२२) दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी गणेश मोरे (वय २१, रा. गुलटेकडी) याच्याविरुद्ध पोक्सो अंतगर्त  गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गेल्या वर्षी १९ डिसेंबर २०२१ रोजी घडला होता.

 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १४ वर्षाच्या मुलीला गणेश मोरे याने लग्नाचे आमिष दाखवून मोटारसायकलवर बसवून तळजाई मंदिराशेजारील जंगलात असलेल्या पडीक बंगल्यात नेले.

तेथे तिच्याबरोबर बळजबरीने शरीर संबंध केले. त्यानंतर कात्रज घाटाचे पलीकडे शिवापूरचे जंगलात नेऊन तेथे तिच्याबरोबर शरीरसंबंध केले. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे मुलीला मानसिक धक्का बसला. तिने स्वत: चे अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वालकोळी करीत आहेत.

Web Title: girl was taken and set on fire for refusing to marry after rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here