Home क्राईम अमृता फडवणीस यांच्या पोस्टवर अक्षेपार्हे कमेंट करणं तरुणाला पडलं चांगलंच महागात

अमृता फडवणीस यांच्या पोस्टवर अक्षेपार्हे कमेंट करणं तरुणाला पडलं चांगलंच महागात

Amruta Fadanvis news:  अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लील आणि खालच्या पातळीची भाषा.

Amruta Fadanvis

 

Pune:  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट करणे चांगलेच महागात पडले आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा गावातील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.   

अमित सुदाम वायकर (रा. कावळेमळा, चाळकवाडी-पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत जुन्नर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्या आशा बुचके यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लील आणि खालच्या पातळीची भाषा वापरली असा आरोप या तक्रारीत केला होता. अर्वाच्च भाषा वापरत कमेंट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पक्षाच्या नसल्या किंवा अमृता फडणवीस जरी असल्या तरी देखील महिलेबाबत अशा भाषेत कमेंट करणे योग्य नाही. त्या आमच्या नेत्यांच्या पत्नी आहेत. त्यांच्याबाबत अशी कमेंट करुन आमच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथील सभेत खरी शिवसेना आमच्या सोबतच असल्याचे म्हटले होते. त्याबाबत बातमी प्रसारित झाली होती. त्यावर अमित वायकर याने कमेंट केली होती. ही कमेंट फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना उद्देशून केली होती. ती कमेंट करणं तरुणाला महागात पडलं आहे.

Web Title: Amruta Fadanvis Post Comment youth arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here