Home क्राईम मामाच्या घरी लग्नाला आलेल्या मुलीवर अत्याचार, मुलगी गरोदर

मामाच्या घरी लग्नाला आलेल्या मुलीवर अत्याचार, मुलगी गरोदर

Nashik Crime: अल्पवयीन मुलीशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध (Sexual abused) प्रस्थापित केल्याने ती गरोदर राहिल्याची घटना.

Girl who came to get married at Uncle's house sexual abused

नाशिक: बिटुर्ली (ता. इगतपुरी) येथे मामाच्या घरी लग्नाला आलेल्या नासेरा (ता. मोखाडा) येथील अल्पवयीन मुलीशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गरोदर राहिल्याची घटना उघडकीस आली आहे.

नासेरा येथून मामाच्या गावी बिटूर्ली येथे आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्याशी वारंवार संबंध प्रस्थापित केल्याने ती गरोदर राहिली, तिचे पोट दुखत असल्याने उपचारासाठी कुटुंबीयांनी मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेल्यावर ती गरोदर असल्याचे समजले.

याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. हा गुन्हा मोखाडा पोलिस ठाण्याकडे होता मात्र संशयित हा घोटी पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने तो गुन्हा घोटी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश पवार तपास करत आहे.

कुटुंबीयांनी मोखाडा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. संशयिताचे नाव मुलीने सांगितल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Girl who came to get married at Uncle’s house sexual abused

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here