Home औरंगाबाद आठ दिवसांपूर्वी बेपत्ता; पुन्हा घरी आली, पोलीस ठाण्यात जाताच म्हणाली मामाकडे जायचंय,...

आठ दिवसांपूर्वी बेपत्ता; पुन्हा घरी आली, पोलीस ठाण्यात जाताच म्हणाली मामाकडे जायचंय, घेतला टोकाचा निर्णय

Chatarapati  Sambhajinagar:  २० वर्षीय मुलीने मामाच्या घरी राहण्याचा आग्रह केला अन् मामाकडे घरात मोठ्या उपरण्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

girl insisted on staying at her maternal uncle's house and committed suicide

छत्रपती संभाजीनगर: आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २० वर्षीय मुलीने मामाच्या घरी राहण्याचा आग्रह केला अन् मामाकडे घरात मोठ्या उपरण्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि २४ रोजी एकता नगर पंढरपूर येथे समोर आली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, निकिता रामदास मुगदल (वय २० रा. एकता नगर पंढरपूर) असे गळफास घेतलेल्या तरुणीचं नाव आहे. निकिता ही नुकतीच बारावी पास झाली होती. तिचे आई वडील मजुरीचे काम करतात. निकीताला तीन बहिणी एक भाऊ आहे.

दरम्यान, निकिता ही १७ जुलै रोजी घरातून बेपत्ता झाली होती. रविवार दिनांक २३ रोजी ती घरी आली असता नातेवाईकांनी तिला पोलीस ठाण्यामध्ये नेलं. यावेळी तिने पोलिसांना सांगितलं की मी स्वतः निघून गेले होते. माझे अपहरण झाले नव्हते त्यामुळे माझी कोणाविरोधात तक्रार नाही असा जबाब तिने पोलिसांकडे लिहून दिला होता. जबाब लिहून दिल्यानंतर आईसोबत घरी जाण्याऐवजी निकिताने मामाच्या घरी पंढरपूर येथे जाण्याचा आग्रह धरला. त्यानुसार ती मामाच्या घरी गेली.

सोमवारी सकाळी तिने मामाच्या घरी दुसऱ्या मजल्यावर रूममध्ये छताच्या हुकाला उपरणे बांधून गळफास घेऊन आयुष्य संपविले. घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. दरम्यान, तिला तात्काळ घाटी रुग्णाला दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. निकिताने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हेडकॉन्सटेबल उदे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: girl insisted on staying at her maternal uncle’s house and committed suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here