Home अहमदनगर गोदामासाठी दिलेली जागा खाली न केल्याने चक्क आग लावली

गोदामासाठी दिलेली जागा खाली न केल्याने चक्क आग लावली

Ahmednagar News:  शालेय साहित्याच्या गोदामासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने गोदामाला चक्क आग (Fire) लावून देण्याचे कृत्य जागामालकाच्या पुतण्याने केल्याची घटना घडली आहे.

the fire was started because the space provided for the godown was not taken down

कोपरगाव:   शालेय साहित्याच्या गोदामासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने गोदामाला चक्क आग लावून देण्याचे कृत्य जागामालकाच्या पुतण्याने केल्याची घटना घडली. हा प्रकार  सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी स्टेशनरी दुकानदाराने कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  विशाल विजय नानकर यांचे कोहिनूर बुक स्टॉल नावाचे दुकान आहे. दुकानासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी कहार गल्ली येथे विक्रम मधुकर मेहरे (रा. कोकमठाण ) यांच्या चुलत्याचे गोदाम भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेले हे गोदाम रिकामे करून देण्यासाठी मेहरे हे नानकरकडे तगादा लावत होते. परंतु नानकर यांनी गोदाम रिकामा करून देण्यास असमर्थता दर्शविली होती. त्याचा राग येऊन विक्रम मेहरे यांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गोदामाला चक्क आग लावून दिली. याआगीत शालेय साहित्य वह्या, पुस्तके, छत्र्या, नोटीस बोर्ड व इतर स्टेशनरी जळून खाक झाली होती.

आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या बंबाला दोन तासांचा अवधी लागला होता. घटनेनंतर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. एक दिवसानंतर नानकर यांनी कोपरगाव पोलीस स्टेशन गाठून वरील आशयाची तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित विक्रम मधुकर मेहरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील  तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बी.एच. दाते करीत आहेत.

Web Title: the fire was started because the space provided for the godown was not taken down

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here