Home पुणे Rape | धक्कादायक! मैत्रिणीच्या पतीने तरुणीवर केला बलात्कार, दोघांना अटक

Rape | धक्कादायक! मैत्रिणीच्या पतीने तरुणीवर केला बलात्कार, दोघांना अटक

Girlfriend's husband rape girl, arrests two

पुणे | Pune Crime: मैत्रिणीच्या पतीने तरुणीला धमकावून बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीच्या पतीने समाजमाध्यमावर व्हिडीओ व फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे वय २२ आणि आशिष विजय कांबळे वय २३ दोघे रा. थिटे वस्ती खराडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सिद्धार्थ पिडीत तरुणीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने तरुणीला संदेश पाठविला होता. तु मला खूप आवडते. त्यानंतर सिद्धार्थ तरुणीला घेऊन मोटारीने फिरायला गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने तरुणीचे व्हिडियो व फोटो काढले. फोटो प्रसारित करण्याची धमकी देत त्याने तरुणीकडून १७ हजार रुपये घेतले. त्यानंतर सिद्धार्थचा मित्र आशिषने धमकाविण्यास सुरुवात केली. आशिषने तिच्यावर बलात्कार केला. त्या तरुणीला मारहाण करीत पैशाची मागणी केली. दोघांच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस उप निरीक्षक काळे अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Girlfriend’s husband rape girl, arrests two

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here