Home अहमदनगर पोहोण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तर एकाला वाचविण्यात यश

पोहोण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तर एकाला वाचविण्यात यश

Parner young man who went for a swim drowned

Shrirampur | श्रीरामपूर : उष्णता चांगलीच वाढलेली असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. टाकळीभान टेलटँकमध्ये मित्रांसोबत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका नवशिक्या तरुणाचा पाण्यात बुडून (drowned) मृत्यू झाला. सुदैवाने आणखी एकाला वाचवण्यात तिसर्‍या मित्राला यश आले.

टाकळीभान टेलटँकमध्ये सुमारे 65 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने उन्हात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरीक दररोज टेलटँककडे जात असतात. रविवारी दुपारी येथील स्वराज सुरेश कोकणे (वय 18) हा आपल्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी टेलटँकवर गेला होता. स्वराज व त्याचा एक मित्र पोहणे शिकत होते तर तिसरा मित्र पोहण्यात तरबेज होता. त्यामुळे त्यांनी हवेची एक ट्युब सोबत नेली होती. मेन गेटच्या बाजुने पाण्याची खोली जास्त असल्याने हे तिघेही सांडव्याच्या बाजुने उथळ पाण्यात पोहण्यासाठी गेले.

मात्र सांडव्याच्या बाजुने टेलटँकमधुन मोठ्या प्रमाणात गौण खनिज मुरुमाचा उपसा झाल्याने खोलवर खड्डे झाले आहेत. या तरुणांना नेमका या खड्यांचा अंदाज आला नाही. अचानक तोल जावुन ते 20 ते 22 फुट खोलीच्या खड्यात पडले. पोहण्यात तरबेज असलेल्या तिसर्‍या मित्राने एकाला तातडीने पाण्यातुन बाहेर काढण्यात आले मात्र त्याला बाहेर काढण्यात त्याचा वेळ गेल्याने स्वराज पाण्यात बुडाला. या घटनेने घाबरलेल्या दोन्ही मित्रांनी पाण्याबाहेर येवुन आरडाओरड केल्याने शेजारी मदतीला धावले. मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता. ही बातमी गावभर पसरताच नागरीकांनी टेलटँककडे धाव घेतली. जलतरणपटु रावसाहेब बनकर यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बराच वेळ पाण्यात शोध मोहीम सुरु होती. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. प्राईड अकडमीच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश (बापु) गोपिनाथ कोकणे यांचा स्वराज हा एकुलता एक मुलगा होता.

Web Title: Parner young man who went for a swim drowned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here