Home महाराष्ट्र मोठी बातमी: औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतराला शिंदे फडवणीस सरकारची स्थगिती

मोठी बातमी: औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतराला शिंदे फडवणीस सरकारची स्थगिती

Renaming of Aurangabad and Osmanabad postpond: शिंदे फडवणीस सरकारने औरंगाबाद व  उस्मानाबाद नामांतराला स्थगिती दिल्याचा निर्णय सूत्रांची माहिती.

Government postpones renaming of Aurangabad and Osmanabad

मुंबई: महाविकास आघाडी कोसळण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेतले होते. औरंगाबाद, उस्मानाबाद व मुंबईचे विमानतळ यांच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने या निर्णयाला स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारने  अखेरच्या क्षणी नियमबाह्यपणे हे निर्णय घेतले असून ते स्थगिती करुन नव्यानं निर्णय घेतले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली आहे. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्षेप घेतला होता. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Government postpones renaming of Aurangabad and Osmanabad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here