Home महाराष्ट्र Rape | धक्कादायक घटना:  तरुणीचे धर्मांतर करून बलात्कार, ८ जणांविरुध्द गुन्हा

Rape | धक्कादायक घटना:  तरुणीचे धर्मांतर करून बलात्कार, ८ जणांविरुध्द गुन्हा

Latur Rape Case: २७ वर्षीय तरुणीचे धर्मांतर करून तिच्यावर बलात्कार, डॉ. खयूम खानसह ८ जणांविरुध्द शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल.

Rape of a young woman by conversion

लातूर: एका २७ वर्षीय तरुणीचे धर्मांतर करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लातुरात समोर आली आहे. यासंदर्भात पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून शहरातील शिवाजीनगर पोलिसांत बलात्कार, ॲट्रॉसिटीअंतर्गत डॉ. खयम खानसह अन्य ७ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे..

यासंदर्भात पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत सांगितलेली हकीकत अशी की, शहरातील तहसील कार्यालयासमोरील खान कॉम्प्लेक्समध्ये पीडित तरुणीचे दुकान होते. याच कॉम्प्लेक्समधील तिच्या गाळ्याच्या समोर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अराफत लाईक खान (वय २८, रा. झिंगणप्पा गल्ली, लातूर) हाही इलेक्ट्रिकल्सचे दुकान चालवीत होता. शेजारी शेजारी दुकान असल्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली त्यातून अराफत खान याने ऑक्टोबर २०१८ मध्ये या तरुणीकडे लग्नाची मागणी घातली आणि तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. यासंदर्भात तिच्यासोबत एका बाँड पेपरवर करार करण्यात आला. त्यानंतर दि. १ डिसेंबर २०१९  रोजी लग्न करावयाचे आहे असे सांगून एका मौलानाकडून पीडित तरुणीस नमाज, कुराण, कलमा पडण्याचे शिक्षण दिले. त्यानंतर तिला कोर्टात नेऊन मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीस खाडगाव रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊन दिला आणि तिथे तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार करण्यात आले. कालांतराने आरोपीने तिच्याशी लग्न करण्याऐवजी दुसऱ्याच मुलीशी लग्न जुळवले. ही माहिती मिळताच पीडित तरुणी अराफत खान याच्या झिंगणप्पा गल्ली येथील घरी गेली आणि तिने याचा जाब विचारला असता, तिथे अराफत लाईक खान आणि त्याच्या घरच्यांनी जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, यासंदर्भात मुख्य आरोपी अराफत लाईक खान याच्यासह त्याची आई शाहीन लाईक खान, बहीण अफशा फिरदोस उजेडे, भाऊजी फिरदोस उजेडे, चुलता समी खयूम खान, मेहराज खयूम खान, आजोबा डॉ. खयूम खान शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rape of a young woman by conversion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here