दुधाला प्रती लिटर ३० रुपये भाव मिळावा यासाठी अकोलेत रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध
अकोले(Akole): शहरातील महात्मा फुले चौकात आज सकाळी भर रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. रस्त्यावर दुध ओतून सरकारचा प्रतीकात्मक निषेध केल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दुधाला प्रती लिटर ३० रुपये भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरु करण्यात आले. सरकारने १० रु. प्रती लिटर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हे आंदोलन आता राज्यभर पसरणार आहे. अकोले तालुक्यात २१ जुलै पासून दुग्धाभिषेक आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, किसान सभेचे प्रदेश सचिव डॉ. अजित नवले, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेश नवले, अध्यक्ष सुरेश नवले. भाकपचे जेष्ठ नेते शांताराम वाळूंज, संभाजी बिग्रेडचे संयोजक डॉ. संदीप कडलग, सोमनाथ नवले, दुध उत्पादक संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Government protests by pouring milk on the streets of Akole