प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क व्हावे: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर(Sangamner): करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क व्हावे असे सक्त आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत.
संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळ प्रसंगी कटू निर्णय घेतले तरी चालतील असे सांगण्यात आले.
रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वापतरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र यात नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची असून त्यांनी याबाबतीत नियमांचे पालन न केल्यास संगमनेर तालुक्यात लॉकडाऊनच्या दिशेने पावले उचालावी लागतील असे संकेत बाळासाहेब थोरात यांनी दिले.
गेले चार महिने प्रशासन अत्यंत जबाबदारीने ही लढाई लढत आहे. त्यांच्या जोडीने वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर, पोलीस कर्मचारी, स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे.
यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे,मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी उपस्थित होते.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner officials should be more vigilant