Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात, लाच घेताना रंगेहाथ पकडला

अहमदनगर ब्रेकिंग: ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात, लाच घेताना रंगेहाथ पकडला

Ahmednagar News: गाय गोठ्याचे प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी शेतकर्‍याकडे सात हजार रुपयांची मागणी करणारा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात, सापळ्यामध्ये ग्रामसेवकाने 5 हजार रुपयांची लाच (bribery) घेताना रंगेहाथ पकडला.

Gramsevak caught red-handed in bribery net

कर्जत | Karjat:  गाय गोठ्याचे प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी शेतकर्‍याकडे सात हजार रुपयांची मागणी करणारा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द गावचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. ओंकार ईश्वर आवटे, (वय 25) असे या अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

तक्रारदार हे चांदे खुर्द येथील 30 वर्षीय शेतकरी आहेत. त्यांनी शासनाच्या गाय गोठा योजनेअंतर्गत पंचायत समिती कर्जत येथे प्रकरण सादर केले होते.ते मंजूर करून देण्यासाठी ग्रामसेवकाने शेतकर्‍याकडे 7 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार 11 एप्रिल रोजी विभागाच्या पथकाने चांदे खुर्द येथे जाऊन पडताळणी केली. पडताळणी दरम्यान ग्रामसेवकाने कर्जतचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याकडून गाय गोठ्याचे प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी शेतकर्‍याकडे सात हजारांच्या मागणीतील पाच हजार रुपये काम होण्याआधी आणि काम झाल्यावर दोन हजार स्वीकारण्याचे मान्य केले.

लाचलुचपत विभागाच्या सापळ्यामध्ये ग्रामसेवकाने 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडला. याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सापळा अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी काम पाहिले. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक हरिश खेडकर यांनी काम पाहिले. या पथकामध्ये पोलीस अंमलदार रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, रवी निमसे, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक दशरथ लाड, हारुण शेख यांचा समावेश होता.

Web Title: Gramsevak caught red-handed in bribery net

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here