विवाह ठरत नसल्याने गोळी झाडून आत्महत्या
नैराश्यातून ३६ वर्षीय तरुणाने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
आचरा | सिंधुदुर्ग: लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून ३६ वर्षीय तरुणाने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मठ बुद्रुक गावात घडली. चंद्रशेखर भालचंद्र मुळ्ये ( लिंग्रसवाडी) असे त्याचे नाव आहे.
मृत चंद्रशेखर याच्या वडिलांनी आचरा पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखरचे लग्न ठरत नव्हते. त्यामुळे तो नैराश्येत असायचा. मंगळवारी दुपारी राहत्या घराच्या मागील बाजूस त्याने ठासणीच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडली. गोळीचा बार होताच कुटुंबीय व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला.
Web Title: marriage was not working, he committed suicide by shooting himself
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App