Home अहमदनगर Accident: ट्रॅक्टर पलटी होऊन अपघातात आजोबा नातवाचा जागीच मृत्यू

Accident: ट्रॅक्टर पलटी होऊन अपघातात आजोबा नातवाचा जागीच मृत्यू

Grandfather and grandson died on the spot in a tractor overturn Accident

पारनेर | Accident: ट्रॅक्टरच्या सहायाने पेरणी करीत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना अलभरवाडी वाडेगव्हाण शिवारात शुक्रवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात आजोबा व नातू जागीच ठार झाले आहे.

याप्रकरणी ट्रॅक्टर चालक जालिंदर नानाभाऊ गुलदगड वय ३८ यादववाडी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

तुकाराम भिमाजी तरडे वय ४८ व शुभम दत्तात्रय तरडे अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यादववाडी शिवारातील शेतात ट्रॅक्टरला जोडलेल्या पेरणी यंत्रावर बसून तुकाराम तरडे व शुभम पेरणी करत होते. तर जालिंदर हा ट्रॅक्टर चालवत होता. पेरणी सुरु असताना चालक जालिंदर याने ट्रॅक्टर बांधावर चढविला. बांधावरील भरावामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली तुकाराम व शुभम हे चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  

Web Title: Grandfather and grandson died on the spot in a tractor overturn Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here