Home अहमदनगर Crime News: खासगी सावकारकीमुळे या माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

Crime News: खासगी सावकारकीमुळे या माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

Crime News against three including this former corporator due to private lending

जामखेड | Crime News: खासगी सावकाराकडून व्याजाने घेतलेले एक लाख रुपये परत न दिल्याने आरोपींनी फिर्यादीचे चार चाकी व वाहन व एक दुचाकी पळवून नेल्याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकासह तिघांविरोधात खासगी सावकाराकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी सुरेश गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी अशोक बोबडे याच्या घरी गेले त्यांनी लगेच आम्हाला एक लाख रुपये द्या असे सांगितले. मात्र ती रक्कम बोबडे यांनी देण्यास असमर्थता दाखवली. आज एवढे पैसे नाहीत दोन दिवसांनी तुमचे पैसे देतो असे म्हणाले, मात्र माजी नगरसेवक आरोपी संदीप गायकवाड व अन्य अन्य तीन अनोळखी व्यक्तींनी  ऐकून न घेता अशोक बोबडे याच्या घरासमोरून पिकप  मोटारसायकल घेऊन गेले.

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

दरम्यान अशोक बोबडे यांनी जामखेड येथील खासगी सावकाराकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. वरील तिघे जण एक महिन्यापासून घरी येऊन पैशाची मागणी करीत होते.

याप्रकरणी अशोक बोबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी आरोपी माजी नगरसेवक सुरेश गायकवाड, शेखर रिटे व एक अनोळखी यांच्यावर गुन्हा सावकाराकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime News against three including this former corporator due to private lending

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here