Home अकोले Crime News: अकोले तालुक्यात घराच्या आडोशाला अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक

Crime News: अकोले तालुक्यात घराच्या आडोशाला अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक

Crime News Man arrested for selling illegal liquor in Akole taluka

अकोले | Crime News: अकोले तालुक्यातील निब्रळ येथे आपल्याच राहत्या घराच्या आडोशाला दारू विक्री करताना एकास रंगेहाथ आढळून आल्याने मुद्देमाल हस्तगत करून त्याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अकोले पोलिसांनी केली.

याबाबत माहिती अशी की, अकोले तालुक्यातील निब्रळ येथील आरोपी प्रकाश तुकाराम आगिवले वय ३२ हा बेकायदेशीर अवैध दारू विक्री करताना त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला मिळून आला. त्याच्या ताब्यातील अंदाजे ७८० रुपयांची संत्रा कंपनीच्या १८० मिलीच्या सीलबंद बाटल्यासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल सुहास गोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश तुकाराम आगिवले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शेरमाळे हे करीत आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याचे आव्हान अकोले पोलिसांवर ठाकले आहे.

Web Title: Crime News Man arrested for selling illegal liquor in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here