Home संगमनेर संगमनेर शहरात बर्निग थरार,  चार चाकी सफारी बुलेट, केटीएम मोटारसायकल जळुन खाक

संगमनेर शहरात बर्निग थरार,  चार चाकी सफारी बुलेट, केटीएम मोटारसायकल जळुन खाक

Sangamner four wheeler and bullet burning 

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील पोलिस ठाण्याजवळच हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरपालिका क्रीडांगण जवळच भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष संपतराव गलांडे यांचे घर आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने संपतराव गलांडे यांच्या मालकीच्या चारचाकी सफारी गाडी,  दुचाकी बुलेट व केटीएम अशा गाड्या घरासमोर उभ्या असताना जाळल्याची घटना घडली आहे.

ही घटना २६ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घडवून आणली आहे असा प्राथमिक अंदाज आहे. घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अज्ञात व्यक्तीची ओळख समजू शकलेली नाही. घटना समजताच भारतीय जनता पक्षाचे व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी भेट दिली असता समाज माध्यमातून जळुन खाक झालेल्या गाड्यांचे फोटो व्हायरल झाले आहे. ही घटना एक निंदनीय असल्याचे समाजमाध्यामातून प्रतिक्रिया उमटत आहे.

संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गलांडे कुटुंबावर हा एक मोठा घातपात व कट असल्याचा अंदाज सामाजिक कार्यकर्तेकडुन बांधला जात आहे.

Web Title: Sangamner four wheeler and bullet burning 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here