Home अकोले अकोले पंचायत समितीतील प्रभारी गटशिक्षणाधिकारी निलंबित

अकोले पंचायत समितीतील प्रभारी गटशिक्षणाधिकारी निलंबित

Breaking News | Akole: शिक्षकांच्या परस्पर बदल्या केल्याचा ठपका ठेवत  (Suspended) कारवाई करण्यात आली आहे.

Group Education Officer in charge of Akole Panchayat Samiti suspended

अहमदनगर : शिक्षकांच्या परस्पर बदल्या केल्याचा ठपका ठेवत अकोले पंचायत समितीतील प्रभारी गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांना निलंबित करण्यात आल्याची कारवाई नुकतीच करण्यात आली आहे.  जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई केली. खताळ यांना २३ जानेवारी २०२४पासून सेवेतून तात्पुरते दूर केले आहे. खताळ यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

खताळ यांच्या कार्यपद्धतीबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ या कालावधीत त्यांनी पदाचा दुरुपयोग करत अधिकार कक्षेत नसताना आठ शिक्षकांच्या स्वतःच्या स्वाक्षरीने तसेच २७ शिक्षकांच्या तोंडी आदेशाव्दारे अशा एकूण ३५ शिक्षकांच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत परस्पर बदल्या केल्या आहेत. त्यामुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियमा १९६७ मधील नियम ३चा भंग करून कर्तव्यामध्ये गंभीर कसूर केली. ही बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे खताळ यांना २३ जानेवारी २०२४पासून सेवेतून तात्पुरते दूर केले आहे. त्यांच्याविरूध्द कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Group Education Officer in charge of Akole Panchayat Samiti suspended

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here