Home संपादकीय नवीन वर्ष सुरु झाले, नववर्षाच्या शुभेच्छा! नव्या वर्षाचा संकल्प काय?

नवीन वर्ष सुरु झाले, नववर्षाच्या शुभेच्छा! नव्या वर्षाचा संकल्प काय?

Gudhi Padva 2023: “गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा”!!!

Gudhi Padva 2023 Happy Wishesh Marathi New Year

Gudhi Padva 2023: “गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा”!!! नूतन वर्ष सुरू झाले आहे. स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. त्यामुळे सुरू होणार्‍या नवीन वर्षाच्या सुरवात होताच आम्ही आपल्याला काही टिप्‍स देत आहोत.

स्वत:साठी वेळ काढा-

घरातील कामकाज व नोकरीतील टेन्शन यात ‘सॅंडविच’ होत असते. त्यामुळे व्यक्तीचा स्वत:कडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. दिवसभरातून किमान 10 ते 15 मिनिटे स्वत:साठी काढून ठेवली पाहिजे. या पंधरा मिनिटात आपण एखादा छंद जोपासू शकता. व्यायाम करून फिट राहू शकता.

सकारात्मक विचार करायला शिका-

एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा अर्थ काढणे, त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टीचा उगाच बाऊ करणे, हा आपला स्वभाव बनून जातो. त्यामुळे आपल्या मनावर तसेच आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. त्यासाठी नवीन वर्षात सशक्त व सकारात्मक विचारसरणीचा संकल्प केला पाहिजे. आपला विचार सकारात्मक असला म्हणजे भविष्यात आपले कोणीच वाईट चिंतणार नाही, हे ठामपणे ठरविले पाहिजे. अशा गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवत असतात. अगदी कठिण परिस्थितीत आपल्याला सामना करण्याची हिंमत देतात.

स्वत:ची कामे स्वत: करा-

आपल्याला सगळ्यात जास्त त्रास स्वत:मुळेच होतो. कुठली ना कुठली वाईट सवय आपल्याला जडलेली असते. त्यात आपला आद्य शत्रू म्हणजे आळस. आपण किमान स्वत:ची तरी कामे स्वत: केली पाहिजेत. नियोजन आखून कामे उरकली पाहिजे. त्यामुळे आपल्याला कामाची शिस्त लागते.

Web Title: Gudhi Padva 2023 Happy Wishesh Marathi New Year

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here