Home Accident News भरधाव वेगाने बस आली अन् थेट 15 ते 20 फुट खाली कोसळली,...

भरधाव वेगाने बस आली अन् थेट 15 ते 20 फुट खाली कोसळली,  बसमध्ये 35 प्रवासी अन…

Pune Accident News: मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून सुमारे 15 फूट खाली कोसळून अपघात झाल्याची घटना.

Pune Accident bus came at high speed and directly fell down 15 to 20 feet

पुणे: पुण्यातील अपघाताने खळबळ उडाली आहे. मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून सुमारे 15 फूट खाली कोसळून अपघात झाला आहे.

हा अपघात रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जात होती. यावेळी बस बावधन परिसरात मुख्य रस्त्यावरुन सर्व्हिस रोडवर जात होती.

त्यावेळी बसचालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट 15 ते 20 फुट खाली कोसळली. सुदैवानं या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र काही प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात भीषण होता मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही बस मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे बायपासवरून साधारण 15 फूट खाली कोसळली आणि पलटली.

या बसमध्ये 35 प्रवासी होते. यातील 8 प्रवासी जखमी झाले आहेत. या सगळ्या जखमी प्रवाशांना कोथरुडमधील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. बस थेट पुलावरुन सर्व्हिस रोडवर जाताना कोसळली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या परिसरात कायम वर्दळ असते.

Web Title: Pune Accident bus came at high speed and directly fell down 15 to 20 feet

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here