Home क्राईम संगमनेरात गुटखा जप्त, विक्री करताना कारवाई

संगमनेरात गुटखा जप्त, विक्री करताना कारवाई

Sangamner Crime:  अडीच हजार रुपयांचा गुटखा जप्त (Seized).

Gutkha seized in Sangamner, action taken while selling

 

संगमनेर:  गुटखा विक्रीस बंदी असतानाही गुटखा विक्री करताना आढळल्याने पोलिसांनी संबंधित इसमांकडून अडीच हजार रुपयांचा गुटखा जप्त केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील मदिना नगर परिसरात घडली.

महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थां ची विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असलेली सुगंधी सुपारी व मसाला खाण्यासाठी अपायकारक आहे हे माहीत असतानाही या पदार्थांची विक्री मदिनानगर परिसरात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी याठिकाणी पाहणी केली असता युसूफ शेख विक्री करताना आढळून आला.

याबाबत पोलीस नाईक गजानन गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी युसूफ ऊर्फ पप्पू सुभान शेख (वय 52) रा. मदिनानगर गल्ली नंबर 2 याच्या विरुद्ध गु.र.न. 76/2023 भादवि कलम 188, 272, 273 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एस. के. उगले करत आहेत.

Web Title: Gutkha seized in Sangamner, action taken while selling

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here