Home संगमनेर संगमनेरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त, दोघे जण अटकेत

संगमनेरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त, दोघे जण अटकेत

Gutkha worth lakhs of rupees seized in Sangamner

संगमनेर: संगमनेर तालुक्यात तालुका पोलिसांनी व अन्न औषध प्रशासन यांनी संगमनेरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय माधव भागवत व अक्षय माधव भागवत रा. इंदिरानगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलिसांना गुप्त खबर्याकडून माहिती मिळताच संगमनेर मधून ३.३१ लाखांचा गुटका व दोन लाख किमतीचे वाहन हे गुटका वाहतूक करीत असताना हिवरगाव टोल नाक्याजवळ मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

उच्च न्यायालयाने नुकताच गुटका पानमसाला विक्री करणाऱ्या दुकानदाराला १० वर्षाची शिक्षा व दंडाची रक्कम भरावी लागेल असा निर्णय देण्यात आला होता. आता तालुक्यात गुटकाकिंग पुन्हा तालुक्यातडोके वर काढल्याची घटना समोर आली आहे.  

याप्रकरणी या दोघानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पाटोळे हे करीत आहेत.  

Web Title: Gutkha worth lakhs of rupees seized in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here