Home महाराष्ट्र खासगी बसमध्ये क्लिनरने केला २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार

खासगी बसमध्ये क्लिनरने केला २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार

Young girl was raped by a cleaner on a private bus

अकोला: एका खासगी बस मध्ये नागपूर ते पुणे दरम्यान क्लिनरने २४ वर्षीय तरुणीला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना ६ जानेवारी रोजी रात्री घडली.

याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून ही घटना वाशीम जिल्ह्यात घडल्याने हे प्रकरण मालेगाव पोलिसांत वर्ग करण्यात आले आहे. आरोपी फरार झालेला असून पोलिसांची पथके शोध घेत आहेत.

पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, नागपूर येथून २४ वर्षीय तरुणी पुणे येथे जाण्यासाठी खासगी बसने ५ जानेवारी रोजी सायंकाळी निघाली. बसमध्ये या तरुणीला बऱ्याच वेळ आसन मिळाले नाही. काही वेळाने तिला शेवटच्या आसनावर बसण्यास सांगितले. बस मधील क्लिनरने चाकूचा धाक दाखवून रात्री बलात्कार केला. कोठे बोलल्यास धावत्या बसमधून फेकून देण्याची धमकी दिली. बस पुणे येथे पोहोचल्यावर तरुणीने एमआयडीसी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी समीर देवकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी फरार झाला आहे.  

Web Title: Young girl was raped by a cleaner on a private bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here