Home संपादकीय विश्वासराव आरोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासराव आरोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मा. विश्वासराव आरोटे यांचा सत्कार करताना जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर समवेत भाऊसाहेब वाकचौरे भाजप संघ सरचिटणीस अकोले, अजित गुंजाळ संपादक संगमनेर अकोले न्यूज, पत्रकार हरीश कुसाळकर, राज गवांदे, सागर वाकचौरे आदी. यांनी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विद्यमान राज्यसरचिटणीस श्री.विश्वासराव आरोटे यांच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

ग्रामीण पत्रकारांच्या विविध समस्यांचा गेली दशकभर सातत्याने पाठपुरावा करुन त्या सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न करुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करण्यात महत्वाची भूमिका बजावलेले व्यक्तिमत्व म्हणजे संघाचे विद्यमान सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे होय. 

पत्रकारांसाठी चालविल्या जात असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय अधिवेशने घेतली. जिल्ह्यात, तालुक्यात विविध मेळावे घेतले. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पत्रकार संघामध्ये सामावून घेतले. प्रत्येकाला संघाचे ओळखपत्र देऊन नवी ओळख दिली. सर्वच जिल्ह्यातील पत्रकारांचा विमा काढून खर्‍या अर्थाने पत्रकार संघ या पत्रकारांसाठी काम करत असल्याचा विश्‍वास निर्माण केला. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अहमदनगर जिल्ह्याध्यक्ष आणि नंतर राज्य सरचिटणीस या पदावर काम करण्याची संधी दिली. राज्य कार्यकारिणीवर काम करतानाच त्यांचे काम अतिशय जोमाने सुरु झाले. स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या गुणवंतांचा राज्यस्तरावर गौरव पत्रकार संघाच्या माध्यमातून केला जात आहे. पंडीत श्रीश्री रविशंकरजी यांनाही पत्रकार संघाने गौरविले आले. हलाखीची परिस्थिती असणार्‍या पत्रकारांना औषधोपचारासाठी व इतर गरजा भागविण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही विश्‍वासराव आरोटे यांनी केला आहे. अशा राज्यभरातून अनेक पत्रकारांना संघटनेने आर्थिक मदत केली आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, बाळासाहेब विखे, सुशिलकुमार शिंदे, समाजसेवक अण्णा हजारे, राज्यपाल के. विद्यासागर राव, विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील, दिवंगत गोपीनाथ मुंडे,  उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री दिलीप वळसे, पद्माकर वळवी, रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, बाळासाहेब थोरात,  पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, एकनाथ शिंदे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदींकडे त्यांनी सातत्याने पत्रकारांच्या विविध समस्या मांडल्या. पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमीच आग्रही राहीले. पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांचा निषेध करत आरोपींना अटक होईपर्यंत पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही श्रमिक पत्रकारांप्रमाणेच अ‍ॅक्रीडीशन कार्ड मिळावे, एस. टी. बस तसेच रेल्वेसारख्या विविध सवलती मिळाव्यात, शासनाने त्यांचा आरोग्य विमा काढावा, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, पत्रकारांना निवासासी व्यवस्था उपलब्ध करावी या व अशा अनेक मागण्यांसाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न विश्‍वासराव आरोटे करत आहेत. पत्रकार संघाने याच मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल राज्यपाल विद्यासागर राव यांनीही घेतली होती. गेली १५ वर्षे गुणवंत विद्यार्थी गौरव,मोफत वह्या,दप्तरे तसेच अन्नदान असे विविध उपक्रम सुरु आहेत. मला प्रसिध्दी नको मात्र काम करत राहणे हा स्वभाव अत्यंत गरीबीतून संघर्षमय जिवनातून वाटचाल गुरूवर्य संजय भोकरे यांच्या बहुमोल सहकार्यातून करत आहेत.

उत्तर महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातही पत्रकारांची मोट बांधून त्यांना एका व्यासपिठावर आणण्याचे काम खर्‍या अर्थाने विश्‍वासराव आरोटे यांनी केले आहे. त्यामुळे शासनाकडून जरी या चौथ्या स्तंभाला संरक्षण मिळत नसले तरी पत्रकार संघटना भक्कमपणे या पत्रकारांच्या मागे उभी आहे. त्यांच्यावरील अन्यायाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे असा विश्‍वास पत्रकारांच्या मनात निर्माण करण्यासाठी विश्‍वासराव आरोटे यांनी अथक परिश्रम घेतले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर शासनाचा यशवंतराव चव्हाण पत्रकारीता पुरस्कार तसेच विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्राप्त झाले आहेत. त्यांचे हे कार्य असेच तहहयात सुरु रहावे, हीच अपेक्षा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Website Title: Happy Birthday Viswasrao Arote

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here