Home क्राईम अश्लील मेसेज व फोटो पाठवून महिलेचा विनयभंग

अश्लील मेसेज व फोटो पाठवून महिलेचा विनयभंग

Harassment of a woman by sending obscene messages and photos

रायगड: इन्स्टाग्रामवर फ्रेंडस ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये अश्लील मेसेज व फोटो पाठवून अल्पवयीन मुलींसह महिलेचा विनयभंग केल्याची घटना मुरुडमध्ये घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

दिनांक १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्राम या सोशियल नेटवर्किंगचा वापर करीत बनावट अकाऊंट तयार केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेसह अन्य मुलीना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. अनोळखी व्यक्ती असल्याने फिर्यादी महिलेने ती स्वीकारली नाही. अन्य काही मुलीनीदेखील स्वीकारली नाही. त्यामुळे आरोपीने फ्रेंड्स नावाचा ग्रुप तयार करून त्यामध्ये फिर्यादीसह अन्य मुलीना संमतीशिवाय ग्रुपमध्ये समाविष्ट केले. या ग्रुपवर अश्लील मेसेज व फोटो त्याने पाठविली. आरोपीने फिर्यादी महिलेसह अन्य मुलींचा विनयभंग केला. फिर्यादी महिलने मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात विनयभंग, माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Harassment of a woman by sending obscene messages and photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here