Home Accident News संगमनेर ब्रेकिंग: मोटरसायकल आणि डंपर यांच्यात समोरासमोर अपघात, दोघे ठार

संगमनेर ब्रेकिंग: मोटरसायकल आणि डंपर यांच्यात समोरासमोर अपघात, दोघे ठार

Sangamner Accident:  वडगाव पान फाटा येथे मोटरसायकल आणि डंपर यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन युवा मावस भाऊ डंपर खाली सापडून जागीच ठार (Death).

head-on accident between a motorcycle and a dumper two Death

संगमनेर: दिवाळी सणाच्या तोंडावर संगमनेर तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे.  संगमनेर तालुक्यातील संगमनेर नगर मार्गावर वडगाव पान फाटा येथे मोटरसायकल आणि डंपर यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात (Accident) दोन युवा मावस भाऊ डंपर खाली सापडून जागीच ठार (Death) झाले आहेत. व एक मुलगी जखमी झाली आहे. ही घटना आज गुरुवारी (दिनांक २० ऑक्टोबर २२) रोजी सकाळी घडली आहे. दिवाळीच्या तोंडावर अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अक्षय तात्यासाहेब रोकडे (रा. दुर्गापूर ता. राहाता) आणि सुनील जालिंदर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) असे मयत मयत युवकांचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील सुनील जालिंदर लांडगे हे आपल्या मोटरसायकल वरून राहता येथे कामानिमित्ताने जात होते. त्यांच्या सोबत त्याचा मावसभाऊ अक्षय तात्यासाहेब रोकडे आणि रोकडे यांची मुलगी कावेरी तात्यासाहेब रोकडे (रा. दुर्गापुर, ता. राहता ) हे जात असताना डंपर खाली सापडून या दोघांचा मृत्यू झाला आहे.

तर रोकडे यांची मुलगी कावेरी रोकडे ही गंभीरित्या जखमी झाली आहे. सुनील जालिंदर लांडगे व अक्षय तात्यासाहेब रोकडे अशी मयतांची नावे आहेत.

मयत युवक एमएच १५ बीएफ ९३८७ या मोटरसायकल वरून जात असताना विना क्रमांकाच्या डंपरणे धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: head-on accident between a motorcycle and a dumper two Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here