Home संगमनेर संगमनेर: स्टोन क्रशर चालकावर तहसीलदारांची कारवाई, १७ लाखांचा दंड

संगमनेर: स्टोन क्रशर चालकावर तहसीलदारांची कारवाई, १७ लाखांचा दंड

Sangamner Stone Crusher: मेंढवन येथील बेकायदेशीरपणे स्टोन क्रशर चालकावर तहसिलदारांनी कारवाई केली.

Tehsildar action against stone crusher driver, fine of 17 lakhs

संगमनेर: संगमनेर तालुक्यात मेंढवन येथील बेकायदेशीरपणे स्टोन क्रशर चालकावर तहसिलदारांनी कारवाई केली आहे. स्टोन क्रेशरला सील लावलेले असतानाही बेकादेशीरपणे स्टोन क्रशर चालवून दगडाची अनधिकृत वाहतूक करताना आढळल्याने संगमनेर तहसीलदारांनी स्टोन क्रशर चालकास तब्बल 17 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे स्टोन क्रशर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाचा कारभार हाती घेताच गौणखनिजाचा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यां विरुद्ध कठोर पावले उचलली होती. संगमनेर तालुक्यातील 39 स्टोन क्रशरला सील ठोकण्यात आले होते, असे असतानाही संगमनेर तालुक्यात काही ठिकाणी गौणखनीजाची बेकायदेशीर वाहतूक केली जात होती.

संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी तपासणी केली. या तपासणीमध्ये सिल केलेल्या खानपट्ट्यात अनधिकृतपणे दगड फोडताना, उत्खनन व वाहतूक करताना एक पोकलेन आढळला होता. एका वाहनांमधून अनधिकृत 1 ब्रास दगडाची वाहतूक केली जात होती.

याबाबतचा पंचनामा करून तसा अहवाल समनापूर येथील मंडल अधिकारी यांनी तहसीलदारांकडे सादर केला होता. यानंतर तहसीलदारांनी मनीषा बाळासाहेब काळे (रा. मेंढवण, ता. संगमनेर) यांना नोटीस बजावून दंडात्मक स्वरुपाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा सादर करण्यास सांगितले होते. तहसीलदारांनी मनीषा काळे यांना 17 लाख 14 हजार 960 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Web Title: Tehsildar action against stone crusher driver, fine of 17 lakhs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here