Home महाराष्ट्र डॉलरने खिशाला लावली कात्री: चिंता वाढली! डॉलर मजबूत, रुपया घसरला

डॉलरने खिशाला लावली कात्री: चिंता वाढली! डॉलर मजबूत, रुपया घसरला

ANI Report: Rupee hits a fresh record low, at 83 against US dollar.

Rupee hits a fresh record low, at 83 against US dollar

अमेरिकन डॉलर अन्य चलनांच्या तुलनेत मजबूत झाल्यामुळे जगण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. डॉलरचे मूल्य वाढल्यामुळे आयात महागली आहे. भारतासह सर्वच देशांसमोर ही चिंता आहे. जीवनावश्यक वस्तू महागल्यामुळे लोकांना कुटुंबाचा खर्च भागविणे अशक्य झाले आहे.

रुपया घसरत नसून डॉलरची किंमत वाढते आहे या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या विधानानंतर आधीच घसरणीला लागलेल्या रुपयाबद्दल बाजारात चिंतेचं वातावरण वाढलं होतं. त्यातच रुपयाचा उलटा प्रवास अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. बुधवारी रुपयानं नवा नीचांक नोंदवला असून थेट ८३ वर घसरण झाली आहे. तब्बल ६१ पैशांनी आज रुपयाचं अवमूल्यन झालं आहे. देशातून मोठ्या प्रमाणावर बाहेर जाणारी परकीय गंगाजळी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसागणित अधिकाधिक सक्षम होणारा डॉलर या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती ओढवल्याचं सांगितलं जात आहे.

मंगळवारी रुपया आधीच्या किमतीच्या तुलनेत १० पैशांनी घसरला. ८२.४० रुपयांवर असलेला रुपया बुधवारी मात्र नव्या नीचांकाची नोंद करत ८३.०९ वर पोहोचला.

Web Title: Rupee hits a fresh record low, at 83 against US dollar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here