Home महाराष्ट्र Heat Wave, सूर्य कोपला: उष्‍माघाताने आणखी एकाचा मृत्‍यू

Heat Wave, सूर्य कोपला: उष्‍माघाताने आणखी एकाचा मृत्‍यू

Heat Wave Another died of heatstroke

जळगाव | Heat Wave: मेहूणबारे ता. चाळीसगाव येथील 48 वर्षीय शेतमजुराचा शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास उष्माघाताने मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्यात उष्‍माघाताचा पहिला बळी गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडता सावलीचा व थंड पेयाचा आधार घेत आहेत. शहरासह ग्रामीण भागात जवळपास 40 पेक्षा अधिक अंश सेल्सियसवर पारा गेला असून अशा स्थितीत सर्वच जण उष्णतेने परेशान झाले आहेत.

मेहूणबारे (ता.चाळीसगाव) येथील सुंदरलाल सुकदेव गढरी (वय 48) हा शेतमजूर बकऱ्या चारण्यासाठी गेला होता.

नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेला असता दुपारी दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने ते घरी आले. त्यांना डॉक्टरकडे नेले जात असतांनाच त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. खाजगी डॉक्टरांनी त्यांना तपासले असता उष्माघाताने मृत्यु झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Heat Wave Another died of heatstroke

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here