Home अहमदनगर Rain: नगर तुंबले, घरांत शिरले पाणी, नागरिकांची दाणादाण

Rain: नगर तुंबले, घरांत शिरले पाणी, नागरिकांची दाणादाण

Ahmednagar rain News: सीना नदीला पूर आल्याने कल्याण रोडवरील नागरिकांचा संपर्क तुटला तर ओढ्या नाल्यांचे पाणी थेट नागरिकांच्या घरांत घुसल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली.

Heavy Rain city collapsed, water entered the houses, citizens died

अहमदनगर: नगर शहरासह परिसरात दुसऱ्या दिवशी सलग मुसळधार कोसळल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. सीना नदीला पूर आल्याने कल्याण रोडवरील नागरिकांचा संपर्क तुटला तर ओढ्या नाल्यांचे पाणी थेट नागरिकांच्या घरांत घुसल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. अनेक ठिकाणी घरादरासह दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. शहरासह उपनगर व परिसरांत गुरुवारी रात्रभर पाउस झाला. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

नगर शहर आणि तालुक्यासह राहात्यमध्ये गुरूवारी रात्री धुव्वाँधार पाऊस बरसला. नगरमध्ये सावेडी महसूल मंडलात सलग दुसर्‍या दिवशी 96 मि.मी तर राहाता शहरात 88 मि.मी. पावसाची नोंद झाली.

नगर शहर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी सीना नदीला पूर आला. यामुळे कल्याण रोड भागातील नागरिकांचा नगर शहराशी संपर्क तुटला. दरम्यान, गुरूवारी रात्री जिल्ह्यात 29 महसूल मंडलात 30 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण पावसाची सरासरी ही 61.3 टक्के झाली आहे.

गुरूवारी रात्री अचानक नगर शहर आणि जिल्ह्याच्या अन्य भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता. मात्र, त्यात वाढ होत गेली. विजांचा कडकडाटांसह पाऊस कोसळत असतांना विज गायब झाली. नगर शहरातील सखल भागातील अनेक वसाहती आणि घरात पाणी शिरले. शुक्रवारी सकाळी दिवस उजेडताच सीना नदीचे रौद्र रुप नगरकरांनी पाहिले.

सीनेला यंदाच्या पावसाळ्या पहिल्यांदा पूर आला. या पूराच्या पाण्याचा वेढा नदी काठावरील वसाहती, दुकाने, रहिवासी संकूलांना बसला. शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान पावसाने उघडीप दिली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा नगर शहर आणि परिसारात धुव्वाधार पाऊस कोसळला.

नालेगाव 33, सावेडी 96, कापूरवाडी 49, केडगाव 49, नागापूर 65, जेऊर 47.5, रुईछत्तीशी 33, भाळवणी 49, निघोज 32, मांडवगण 31, कर्जत 49, कोंभळी 64, मिरजगाव 37, माहीजळगाव 37, आरणगाव 38, खर्डा 40, भातकुडगाव 52, सलाबतपूर 42.5, कुकाणा 35, राहुरी 37, टाकळीमियॉ 38, ब्राम्हणी 30, वांबोरी 30.5, दहिगाव 30, पोहेगाव 64.8, बेलापूर 33, राहाता 88, शिर्डी 30, लोणी 30.3, बेलापूर 33 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Heavy Rain city collapsed, water entered the houses, citizens died

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here